विविध स्टोअर्स वर विविध कॅटॅगिरीजमधील विनामूल्य खुप अँड्राइड अॅप्स उपलब्ध आहेत. या पोस्ट मध्ये विविध कॅटॅगिरीधील सर्वात जास्त उपयोगी अॅप्स आहेत जे गूगल प्ले स्टोअरवर फ्री मध्ये उपलब्ध आहेत आणि जे खात्रीने तुमचे जीवन अजून चांगल्या पध्दतीने जगण्यास मदत करतील.
1) Best Sporttracking Apps:
i) SmartRunner:
SmartRunner हे तुमच्या अँड्राइड डिव्हाइस वरील एक sportstracking आणि geotracking अॅप आहे. हे अंतर मोजते, करंट-एव्हरेज आणि सर्वोत्त्म स्पीड मोजते तसेच यासाठी तुम्ही किती कॅलरीज जाळल्या याचा हिशोब सुध्दा ठेवते. यात तुम्ही करीत असलेली रनींग, बाइकिंग, हाइक, वॉक किंवा इतर अॅक्टीव्हिटींचा रेकॉर्ड ठेवते आणि हि सर्व माहिती SmartRunner, फेसबूक किंवा टवीटरवर पब्लीश करते.
डाउनलोड: SmartRunner
ii) Endomondo - Running & Walking:
Endomondo हे तुमच्या स्मार्टफोनला पॉकेट पर्सनल ट्रेनर मध्ये बदलवतात. हे अॅप रनिंग, सायकलींग, वॉकिंग आणि इतर स्पोर्टसाठी आइडीयल आहे. Endomondo सोबत तुम्ही या सर्व अॅक्टीव्हिटी जीपीएस दवारे ट्रॅक करू शकता, याच्या स्टॅटीस्टीक्स तपासू शकतात आणि तुमचा फिटनेस गोल पर्यंत पोहचू शकता.
डाउनलोड: Endomondo - Running & Walking
iii) Google Fit:
गूगल फिट हे तुमची फिटनेस इन्फॉर्मेशन मोजण्यासाठी, ट्रॅक आणि स्टोअर करण्यासाठी वापरू शकता. यात तुम्ही वॉक, रन, बाइक राइड आणि बरेच काही ट्रॅक करू शकता. उदा. तुम्ही किती चाललात, किती बाइक राइडींग केले किंवा किती इतर गेम्स खेळले. ही सर्व माहिती तुम्ही पीसी, मोबाइल डिव्हाइसवर अॅक्सेस करू शकता.
डाउनलोड: Google Fit
iv) RunKeeper - GPS Track Run Walk:
RunKeeper हे अॅप युजरला त्यांच्या फिटनेस अॅक्टीव्हिटी (उदा. चालणे, रनिंग किंवा सायकलिंग) जीपीएस वापरून ट्रॅक करण्यासाठी मदत करते. यात या सर्व अॅक्टीव्हिटींचे ट्रॅक ठेवता येतात आणि सायासाठी किती कॅलरीज जाळल्या हे सुध्दा समजते.
डाउनलोड: RunKeeper - GPS Track Run Walk
2) Best Yoga Apps:
21 जून 2015 रोजी प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेला. योग आपल्या निरोगी जीवनशैली साठी आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवून दीर्घकालीन निरोगी मन आणि शरीर तयार करण्यासाठी योगाचा खुप उपयोग होतो. पण जर तुम्हाला योग क्लास मध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर अॅड्राइड मोबालवर तुम्ही कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी शिकू शकता.
i) Daily Yoga - Fitness On-the-Go:
दैनिक योग प्रत्येकासाठी विकसीत व व्यापक योग प्रशिक्षण सॉफ्टवेअर पुरविण्यावर जास्त लक्ष केंद्रित करीत आहे. हे अॅप हे सुरवाती, मध्यम आणि प्रगत लेव्हलसाठी उपयोगी आहे. यात 50 पेक्षा जास्त एचडी योगा व्हिडीओ आणि 400 पेक्षा जास्त योगा पोज आहेत. तसेच यात योगा करतांना मधूर संगित, सोशल कम्यूनिटी आणि खुप काही आहे.
डाउनलोड: Daily Yoga - Fitness On-the-Go
ii) Yogasana In Hindi:
Yogasanas हा योगीक क्रियांचा एक अत्यावश्यक भाग आहे. आणि शरीर रिलॅक्स आणि स्थिर ठेवण्यासाठी याचा खुप उपयोग होतो. हे अॅप हिंदी मध्ये उपलब्ध आहे आणि यात 50 पेक्षा जास्त योगा पोज असून नेव्हिगेशन सोपे आहे.
डाउनलोड: Yogasana In Hindi
4) Best Health App:
i) iTriage Health:
ITriage मध्ये तुम्ही कोणत्याही रोगाची लक्षणे, त्यांची संभावीत कारणे, त्यासाठी योग्य वैद्यकीय सुविधांचा शोध आणि क्वालिटी रिपोर्ट यांचा वापरून तुमचे मेडिकल बिल कमी करू शकता.
डाउनलोड: iTriage Health
ii) Calorie Counter – MyFitnessPal:
तुम्ही MyFitnessPal चा वापर करून वजन कमी करू शकता. या अॅप मध्ये 5,000,000 अन्नांतील समाविष्ट कॅलरीजचा डाटाबेस आहे जो सतत अपडेट होतो. यात बारकोड स्कॅनर देखील आहे जे अन्नपदार्थांवरील बारकोड स्कॅन करून त्यातील रिसीपी कॅल्क्युलेट करते आणि यात एकाच वेळी अनेक आयटम अॅड करू शकता.
डाउनलोड: Calorie Counter – MyFitnessPal
iii) Instant Heart Rate:
तुमच्या स्मार्टफोनमधील कॅमेरा फ्लॅश वापरून तुमच्या हृदयाचा दर मोजू शकता. आरोग्य सुधारण्यासाठी तुमच्या हृदयाचा दर ट्रॅक करू शकता. यासाठी फक्त तुमच्या बोटाचे टोक कॅमेरा लेन्सवर ठेवा आणि बोटाचा बदलणारा रंगाचे विश्लेषण करून हृदयाचा दर मोजला जाईल.
डाउनलोड: Instant Heart Rate
iv) Lose Weight with Fooducate:
Fooducate हे तुमच्या आरोग्याचा डायड बॉक्स आहे. हे अॅप तुम्हाला चांगले अन्न खाण्यास मदत करते, वजन कमी करण्यास आणि निरोगी राहण्यास मदत करते. Fooducate चा उपयोग तुमचा डायट, निरोगी आणि फिटनेसचे ध्येय साध्य करण्यासाठी करा.
डाउनलोड: Lose Weight with Fooducate
vi) SleepBot - Sleep Cycle Alarm:
SleepBot मध्ये रात्रीच्या झोपेसाठी आवश्यक सर्व काही सापडेल. SleepBot तुमच्या झोपेचा लॉग ठेवेल, हालचालींचा ट्रॅक ठेवेल आणि प्रत्येक दिवशी सर्वोत्तम वेळी तुम्हाला जागे करेल. हे एक अतिशय सोपे अॅप तुमच्या चांगल्या सकाळ साठी आहे.
डाउनलोड: SleepBot - Sleep Cycle Alarm
5) Best News Apps:
i) NewsHunt : India News | eBooks:
NewsHunt हे जगातील सर्वात मोठे बातम्या संकलन आणि ईपुस्तकांना प्रादेशिक भाषेत एकत्र आणते.
डाउनलोड: NewsHunt : India News | eBooks
ii) BBC Hindi:
Android साठी बीबीसी हिंदी अॅपद्वारे हिंदी ताज्या बातम्यांसह कनेक्टेट रहा. हे अॅप वापरण्यास अतिशय सोपे आहे आणि यातील न्यूज लेटेस्ट न्यूज, इंडिया, इंटरनॅशनल, इंटरटेनमेंट, स्पोर्ट, सायन्स आणि मल्टीमिडीया यासारख्या अनेक कॅटॅकिगीमध्ये विभागलेल्या आहे.
डाउनलोड: BBC Hindi
iii) News in Shorts- India News App:
जर तुम्हाला खूप वेळ खर्च न करता काही मिनिटात सभोवतालच्या जगाविषयी जाणून घ्यायचे असेल तर News in Shorts हे अॅप खुप उपयोगी आहे. News in Shorts दुस-या न्यूज अॅपपेक्षा अजून जास्त आहे यात प्रत्येक बातमी ही 60 किंवा त्यापेक्षा कमी शब्दात लिहिली जाते आणि स्क्रोल न करता तुम्ही यात बातम्या वाचू शकतात आणि तुमचा मौल्यवान वेळ वाचवू शकता.
डाउनलोड: News in Shorts- India News App
No comments:
Post a Comment