नांव नसलेले फोल्डर तयार करा :-
या छोटयाश्या लेखात आपण विंडोजची अतिशय लहान आणि सोपी ट्रिक बघणार आहोत, ज्यात आपण एक असे फोल्डर तयार करणार आहोत जे बिना नावाचे असेल. हि ट्रिक कोणत्याही विंडोज ऑपरेटींग सिस्टीमवर चालते.
पुढील प्रमाणे कृती करा -
- ज्या ठिकाणी तुम्हाला फोल्डर तयार करावयाचा असेल, तेथे राईट क्लिक करुन - New- Folder सिलेक्ट करावे.
- आता तुम्हाला येथे New Folder एक फोल्डर तयार झालेले असेल.
- या फोल्डरवर राईट क्लिक करुन Rename सिलेक्ट करावे आणि याचे आधिचे नांव डिलीट करावे.
- आता Alt कि प्रेस करुन किबोर्ड वरील Numpad चा वापर करुन 0160 or 255 नंबर टाईप करावा.
- नंतर प्रेस करुन ठेवलेली Alt कि सोडून नंतर Enter कि प्रेस करावी. आता तुम्हाला येथे नांव नसलेले एक फोल्डर तयार झालेले दिसेल.
सुचना - जेव्हा तुम्ही नंबर टाईप कराल तेव्हा तुम्हाला येथे टाईप होतांना दिसणार नाही तसेच लक्षात ठेवा कि नंबर टाईप करतांना कि बोर्ड वरील Numpad(Numeric Key Pad जे कि बोर्ड च्या उजव्या बाजूला आहे)त्याचा वापर करुन नंबर टाईप करावा. लॅपटॉप युझर साठी नंबर टाईप करतांना Alt+Fun+0160 कि प्रेस करावी
No comments:
Post a Comment