Thursday, July 23, 2015

कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर न करता फोल्डर पासवर्ड ने सुरक्षीत करा



आपलयामधील ब-याच जणांकडे काही खाजगी डेटा असतो, जो आपण इतरांपासुन सुरक्षीत ठेऊ इच्छीतो. या ट्रिक चा वापर करुन आपण विंडोज मध्ये कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर न करता फोल्डर पासवर्ड ने सुरक्षीत ठेऊ शकतो.
पुढील कृतीचा अवलंब करा –
  • एक नवी नोटपॅड फाईल ओपन करा व यात खाली दिलेला कोड कॉपी करुन पेस्ट करा.
  • हि नोटपॅड फाईल lock.bat या नावाने सेव्ह करा.
  • आता या lock.bat या फाईलवर डबल क्लिक करा. तुम्हाला येथे MyFolder नावाचे एक फोल्डर तयार झालेले दिसेल.
  • तुम्हाला जो डाटा सुरक्षीत ठेवायचा आहे तो New folder मध्ये कॉपी करा.
  • नंतर lock.bat या फाईलवर डबल क्लिक करा आणि येथे आलेल्या command prompt च्या मॅसेज मध्ये Y टाईप करुन Enter कि प्रेस करावी.
  • आता MyFolder नावाचे हे फोल्डर हाईड झालेले दिसेल.
  • हे फोल्डर पुन्हा बघण्यासाठी lock.bat या फाईलवर डबल क्लिक करावे. येथे तो तुम्हाला पासवर्ड मागेल, हा पासवर्ड टाकून Enter कि प्रेस करावी. (Default पासवर्ड हा abcd आहे.)
  • तुम्ही हा पासवर्ड बदलवू शकता. यासाठी lock.bat या फाईलवर राईट क्लिक करुन Edit हा पर्याय निवडावा. नंतर तुम्हाला हवा असलेला पासवर्ड abcd च्या जागेवर टाईप करावा.
सुचना –
हि ट्रिक सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी आहे. कॉम्प्युटर मध्ये तज्ञ असलेल्या व्यक्ती फोल्डर ऑप्शन मधील unhidden या पर्यायांचा वापर करुन यातील डाटा बघू शकतात. जास्त सुरक्षीततेसाठी तुम्ही lock.bat हि फाईल दुस-या ठिकाणी कॉपी करुन ठेऊ शकता.
Code:

cls

@ECHO OFF

title www.iteguru.com.com

if EXIST "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" goto UNLOCK

if NOT EXIST MyFolder goto MDMyFolder

:CONFIRM

echo Are you sure to lock this folder? (Y/N)

set/p "cho=>"

if %cho%==Y goto LOCK

if %cho%==y goto LOCK

if %cho%==n goto END

if %cho%==N goto END

echo Invalid choice.

goto CONFIRM

:LOCK

ren MyFolder "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"

attrib +h +s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"

echo Folder locked

goto End

:UNLOCK

echo Enter password to Unlock Your Secure Folder

set/p "pass=>"

if NOT %pass%== abcd goto FAIL

attrib -h -s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"

ren "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" MyFolder

echo Folder Unlocked successfully

goto End

:FAIL

echo Invalid password

goto end

:MDMyFolder

md MyFolder

echo MyFolder created successfully

goto End

:End

नांव नसलेले फोल्डर तयार करा


नांव नसलेले फोल्डर तयार करा :-


folder_without_name
या छोटयाश्या लेखात आपण विंडोजची अतिशय लहान आणि सोपी ट्रिक बघणार आहोत, ज्यात आपण एक असे फोल्डर तयार करणार आहोत जे बिना नावाचे असेल. हि ट्रिक कोणत्याही विंडोज ऑपरेटींग सिस्टीमवर चालते.
पुढील प्रमाणे कृती करा -
  • ज्या ठिकाणी तुम्हाला फोल्डर तयार करावयाचा असेल, तेथे राईट क्लिक करुन - New- Folder सिलेक्ट करावे.
  • आता तुम्हाला येथे New Folder एक फोल्डर तयार झालेले असेल.
  • या फोल्डरवर राईट क्लिक करुन Rename सिलेक्ट करावे आणि याचे आधिचे नांव डिलीट करावे.
  • आता Alt कि प्रेस करुन किबोर्ड वरील Numpad चा वापर करुन 0160 or 255 नंबर टाईप करावा.
  • नंतर प्रेस करुन ठेवलेली Alt कि सोडून नंतर Enter कि प्रेस करावी. आता तुम्हाला येथे नांव नसलेले एक फोल्डर तयार झालेले दिसेल.
सुचना - जेव्हा तुम्ही नंबर टाईप कराल तेव्हा तुम्हाला येथे टाईप होतांना दिसणार नाही तसेच लक्षात ठेवा कि नंबर टाईप करतांना कि बोर्ड वरील Numpad(Numeric Key Pad जे कि बोर्ड च्या उजव्या बाजूला आहे)त्याचा वापर करुन नंबर टाईप करावा. लॅपटॉप युझर साठी नंबर टाईप करतांना Alt+Fun+0160 कि प्रेस करावी