Wednesday, July 13, 2016

कंप्यूटरचे प्रकार

daI;wVjps pkj izzdkj vkgsr- lqij daI;wVj] esuQzse daI;wvj] feuh daI;wVj vkf.k ekldzksdaI;wVj-

lqijdaI;qVj % gk daI;qVje/khy lokZar ‘kDrh’kkyh izdkj vkgs- ;k fo’ks”k {kerk vlysY;k e’khUl eq[;r% eksB~;k lsLFkakdMwu okijY;k tkrkr- IBM pk Blue Gene, jksMjuj vkf.k lsDoksbZvk gs txkrhy lokZr xfreku daI;qVjiSdh dkgh vkgsr-



esuQzse daI;qVj % gs eq[;Ros okrkuqdwfyr tkxsr okujys tkrkr- vxnh lqijdaI;qVj bZrds tjh gs ‘kDrh’kkyh ulys rjh esuQze daI;qVjOnkjs osxoku izdzh;k ‘kD; gksrs- rlsp MsVkgh lkBfork ;srks- mnk-] foek daiU;k yk[kks foek/kkjdkaP;k ekghrhoj izdzh;k dj.;klkBh o rh lkBfo.;klkBh esuQzse daI;qVjpk okij djrkr-


feuh daI;qVj % ;kyk feMjsat daI;wVj vlsgh Eg.krkr- ;k e’khupk vkdkj fjQzhtjsV,o<k vlrks- e/;e vkdkjkP;k daiU;k fdaok eksB~;k daiU;kaps eksBs foHkkx fof’k”B mn~ns’kklkBh ;kapk okij djrkr- mnk-] mRiknu foHkkxke/ks feuhdaI;qVjpk okij dsyk tkrks rks izkeq[;kus mRiknu izdzh;k fu;a=hr dj.;klkBh-




ek;dzksdaI;qVj % deh ‘kDrh vlyh rjh ;kpk okij eksB~;k izek.kkr gksrks- R;kph yksdfiz;rkgh ok<rkauk fnlr vkgs- ek;dzksdaI;qVjps pkj izdkj vkgsr- MsLdVkWi] uksVcqd] VWCkysV ihlh] vkf.k gW.MgsYM daI;qVj-



MsLdVkWi daI;qVj % MsLdoj fdaok MsLdP;k cktqykgh ekoq ‘kdrkr] ek= rs pVdu bZFkqu frFks gyork ;sr ukghr-




uksVcqd daI;qVj % ;kykp yWiVkWi daI;wVj ns[khy Eg.krkr- R;kph ?kMh djrk ;srs- o rs otukykgh gyds vlrkr- vkf.k rs chzQdsl e/ksgh clq ‘kdrkr-




VWcysV ihlh % gk uksVcqd daI;qVjpkp izdkj vkgs- rks gLrfy[khr lqpukapkgh Lohdkj d# ‘kdrks- gs bZuiqV fMthVykbTM dsys tkrs] vkf.k R;kuarj oMZ izkslslj lkj[;k izksxzke izfdz;k d# ‘kdsy v’kk fo’kh”B VsDLV e/ks #iakrjhr dsys tkrs-




gW.MgsYM daI;qVj % gs lokZr ygku vlrkr vkf.k ,dk rGgkrkoj ekm ‘kdrkr- ;kauk ike daI;qVj vlsgh Eg.krkr- ;k izdkjP;k ;a=.kse/;s isu bZuiqV] jk;Vhax jsdxuh’ku] ilZuy vkxZuk;>s’kuy Vwy vkf.k laidZ;a=.kk ;k lokZapk lekos’k vlrks- ilZuy fMthVy vflLVaV ¼ihMh,½ gk lokZr eksB~~;k izek.kkr okijyk tk.kkjk gW.MgsYM daI;qVj vkgs-

Tuesday, May 31, 2016

जुना गॅजेट कसा विक्री करावा? सुरक्षेसाठी प्रथम हे गाइड वाचा आणि मग विक्री करा.

जुना गॅजेट कसा विक्री करावा? सुरक्षेसाठी प्रथम हे गाइड वाचा 

आणि मग विक्री करा.


तुम्ही नविन गॅजेट विकत घेतला आहे का? मग आता तुमच्या जुन्या गॅजेटला निरोप देण्याची वेळ आली आहे आणि लवकरच तो विक्री साठी उपलब्ध असेल. आता वापरंवार आपले गॅजेट बदलण्याची फॅशनच झाली आहे आणि कारणिभूत आहेत ऑनलाइन विक्री करणा-या वेबसाइटसच्या जाहिरातींचा जोरदार प्रचार. तुम्ही कोणतेही गॅजेट आता ऑनलाइन सहजपणे विकू शकतात आणि यात मोबाइल सर्वात आघाडीवर आहे.
पण या गॅजेट मध्ये तुमच्या अॅड्रेस बूक पासून फोटो, व्हिडिओ आणि डॉक्यूमेंटच्या स्वरूपात महत्वपूर्ण माहिती असू शकते. कोणतेही गॅजेट विक्री पूर्वी या डाटाचा बॅकअप घेऊन नंतर तो सुरक्षित डिलीट करावा. पण सावधान! ऑनलाइन उपलब्ध असलेल्या अॅप्सच्या मदतीने हा डेटा सहजपणे रिकव्हर करता येतो. कारण जेव्हा तुम्ही एखादा डेटा डिलीट करता तेव्हा तो प्रत्यक्ष डिलीट होत नाही तर त्याला डिलीटेड म्हणून मार्क केले जाते आणि तो तेथेच असतो जोवर दुस-या एखादया डेटाने तो ओव्हरराइट होत नाही.
येथे काही टिप्स आहेत, वेगवेगळया गॅजेटस् चा बॅकअप कसा घ्यावा आणि ते पूर्णपणे वाइप कसे करावे याविषयी –

Smartphone:
जर तुम्ही तुमच्या कडील जूना स्मार्टफोन विक्री करण्याचा विचार करत असाल तर त्यातील सर्व डेटा पूर्णपणे नष्ट केला आहे याची खात्री करा.बॅकअप कसा घ्यावा आणि तो फोन वाइप कसा करावा -
Android:
बॅकअप कसला घ्यावा याची सूची तपासा:
microSD – जर फोन मध्ये मायक्रोएसडी कार्ड असेल तर ते जून्या फोन मधून काढून नविन फोन मध्ये टाका. Address Book – पूढील मार्गाने जा Contact --> Menu --> Import/export option --> Export to Storage. आता मेमरी मध्ये .vcf फाइल तयार झाली असेल. हि फाइल नव्या फोन मध्ये ट्रान्सफर करून Contact मध्ये Import करा.
Photos, videos and other data – तुमचा फोन पीसी ला कनेक्ट करा आणि हा डाटा पीसी मध्ये कॉपी करा आणि नंतर तो नविन फोन मध्ये ट्रान्सफर करा किंवा Software Data Cable चा वापर करून सरळ एका फोन मधून दूस-या फोन मध्ये ट्रान्सफर करा.
WhatsApp – WhatsApp ओपन करा आणि Options  --> Settings--> Chat History --> Backup conversations ला टॅप करा. आता हे WhatsApp चे फोल्डर नविन मोबाइल मध्ये ट्रान्सफर करा आणि यात WhatsApp इन्स्टॉल करत असतानां Restore चा पर्याय वापरा.
नोट: वरील सर्व गोष्टींचा सेटिंग्ज सह बॅकअप घेण्यासाठी Mobogenie किंवा MOBILedit पीसी सूटचा वापर करणे सोइस्कर होते.
बॅकअप घेतल्यानंतर जून्या फोनमधील हा डाटा नष्ट करण्यासाठी Android मोबाइल मध्ये Factory Reset ची सुविधा आहे आणि ती प्रत्येक ब्रॅंड साठी वेगवेगळी आहे. पण हे पुरेसे नाही, कारण हा डाटा रिकव्हर करता येऊ शकतो. आणि म्हणूनच फोन फॅक्टरी रिसेट केल्यानंतर त्यात डमी डेटा भरा, तो डिलीट करा आणि पुन्हा डमी डेटा भरून डिलीट करा. या अतिरिक्त कृती मूळे फोन मधील ओरिजन डाटा रिकव्हर होण्याची शक्यताच राहत नाही.

USB Drives, SD Cards and External Hard Drives and other removable media:
यूएसबी ड्राइव्ह, SD कार्ड आणि एक्सटर्नल हार्ड ड्राइव्हस् आणि इतर रिमूव्हेबल ड्राइव्हचा बॅकअप घेणे सोपे आहे. फक्त यातील डाटा कॉपी करून सुरक्षित ठिकाणी पेस्ट करावयाचा आहे. पण यातील डेटा पुर्णपणे डिलीट करण्यासाठी खालील बेसिक स्टेप्स आहेत -
ड्राइव्ह कॉम्प्यूटरला कनेक्ट करा.
  • My Computer मध्ये जाऊन या ड्राइव्हवर राइट क्लिक करा आणि Format सिलेक्ट करा.
  • File System मध्ये हवी ती फाइल सिस्टिम सिलेक्ट करा.
  • Volume Label मध्ये या ड्राइव्ह साठी एक लेबल दया आणि Quick Format हा पर्याय सिलेक्ट करा.
  • फॉरमॅटची प्रोसेस सुरू होण्यासाठी Start वर क्लिक करा.
जर हा एक्सटर्नल हार्ड ड्राइव्ह पुर्णपणे वाइप करावयाचा असेल जेणेकरून नंतर त्यातील डेटा रिकव्हर होऊ शकणार नाही तर थर्ड पार्टी टूल CCleaner चा वापर करा. CCleaner हे येथून डाउनलोड करा - http://www.piriform.com/ccleaner/download
  • CCleaner ओपन करा.
  • Tools>>Drive Wiper मध्ये जा.
  • येथे जो एक्सटर्नल ड्राइव्ह वाइप करावयाचा असेल तो सिलेक्ट करा आणि खालील Wipe बटनावर क्लिक करा.

Laptop or Desktop:
जुना लॅपटॉप किंवा डेस्क्टॉपची विक्री करण्यापूर्वी पूढील गाइडचा वापर करा –
लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा बॅकअप घेण्यासाठी बहूतेक युझर्स हे लोकल बॅकअप साठी एक्सटर्नल हार्ड डिस्क चा पर्याय निवडतात. पण जर डेटा खुप जास्त असेल तर थर्ड पार्टी टूल Comodo Backup किंवा Robocopy चा वापर करावा. तसेच मॅक मध्ये System Preferences > Time Machine मध्ये जा आणि Select Backup Disk मधून एक्सटर्नल हार्ड डिस्क निवडा.पण यातील डिलीट केलेला डेटा पुन्हा रिकव्हर होण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून यातील डेटा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी Eraser, CCleaner किंवा Darik's Boot & Nuke यांचा वापर करावा.

बस्स! आता तुमचे गॅजेट बाहेर विक्रीसाठी तयार आहे.

Wednesday, March 16, 2016

लॅपटॉप घेतांना या ८ गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही लॅपटॉप घेण्याच्या विचारात आहात तर ही माहिती तुम्हाला उपयोगात येऊ शकते. लॅपटॉप घेतांना या गोष्टींचा विचार करून लॅपटॉप घ्या. तुम्हाला लॅपटॉप निवडतांना या गोष्टी मदत करतील. 
टच स्क्रीन : जर तुम्हाला टच स्क्रीन गॅजेटची आवड असेल तर तुम्ही टच स्क्रीन लॅपटॉपचा विचार करू शकता. ३०००० पर्यंत टच स्क्रीन लॅपटॉप उपलब्ध आहेत. 
पोर्ट : लॅपटॉप खरेदी करतांना पोर्ट किती आहेत हे तपासून घ्या. एचडीएमआई, यूएसबी, एचडी कार्ड स्‍लॉट हे पोर्ट आहेत का हे नेहमी तपासून घ्या. तुम्ही लॅपटॉप कोणत्या कामासाठी घेणार आहात ही गोष्ट देखील पोर्टसाठी महत्त्वाची ठरते.
वजन आणि डिझाईन : जर तुम्ही प्रवासादरम्यान लॅपटॉप वापरणार असाल तर तुमच्या लॅपटॉपचं वजन महत्त्वाचं ठरतं. अशा वेळेस कमी वजनाचं आणि कमी साईजचा लॅपटॉप तुम्ही घेतला पाहिजे. १२ ते १३ इंचचा लॅपटॉप हा प्रवासादरम्यान वापरतांना उत्तम ठरू शकतो.
ऑपरेटींग सिस्टम : अनेकदा काही लोकं थोडे पैसे वाचवण्यासाठी ओएस नसलेला लॅपटॉप खरेदी करतात. डॉटबेस लॅपटॉप घेतल्यानंतर जर तुम्हाला ओएस इंस्टॉल करता येत नसेल तर ते तुम्हाला महाग पडू शकतं. त्यामुळे ओएस इंस्टॉल असणाराच लॅपटॉप तुम्ही खरेदी करा.
लॅपटॉपचा आकार : जर तुम्ही लॅपटॉप घरी किंवा ऑफिसमध्ये वापरण्यासाठी घेणार असाल तर मोठ्या आकाराचा लॅपटॉप तुम्ही खरेदी करू शकता. पण जर तुम्हाला प्रवासादरम्यान किंवा बाहेर लॅपटॉप वापरायचा असेल तर छोट्या आकाराचा लॅपटॉप खरेदी करा.
फीचर : इंटेल आणि एएमडी मल्टीकोर सीपीयू असलेला लॅपटॉप असणं अधिक चांगलं आहे. यामुळे तुम्हाला चांगली स्पीड मिळेल. त्यासोबतच ३ ते ४ युएसबी स्लॉट असले पाहिजे. 
जुना लॅपटॉप : जुना लॅपटॉप खरेदी करू नका. जुन्या लॅपटॉपचे पार्ट्स जुने झाल्यामुळे कमी स्पीड मिळते. सोबतच तुमचा पर्सनल डेटा हा सुरक्षित राहिलंच याची गँरेटी नाही. 
ऑफर : लॅपटॉप घेतांना ऑफरची वाट पाहु नका. जुने ऑपरेटींग सिस्टीमचे लॅपटॉप विक्री वाढवण्यासाठी दुकानदार अशा ऑफर देतात.  ज्यामध्ये तुमचा काही फायदा असतोच असे नाही. लॅपटॉप घेतांना या ८ गोष्टी लक्षात ठेवा

कीबोर्डवरच्या f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो

दरदिवशी कम्प्युटर तसेच टेक्नॉलॉजीमध्ये काहीनाकाही बदल होत असतात. दरदिवशी आपण दिवसातील सात ते आठ तास कम्प्युटरसमोर बसून काम करत असतो.

मात्र काम करताना तुम्ही हे नोटीस केलंय का की कीबोर्डवर f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो. त्यामागेही कारण आहे. टायपिंगच्या नियमानुसार कीबोर्डवर हा मार्क देण्यात आलाय. 
स्क्रीनवर बघून टाईप करत असताना टाईपिंगच्या नियमानुसार अंगठ्च्या बाजूचे बोट f आणि j या अक्षरावर असणे गरजेचे असते. तसेच इतर बोटे कीबोर्डवरच्या इतर अक्षरांवर असणे गरजेचे असते. त्यामुळेच योग्य प्रकारे टायपिंग करता यावे यासाठी या दोन्ही अक्षरांखाली हा मार्क असतो. 
कीबोर्डवरच्या f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो

मोबाईल अॅडिक्शनपासून दूर ठेवणार हे पाच अॅप

आपल्या मोबाईलवर कायम काही ना काही करण्याची सवय तुम्हाला आहे का? अगदी काही कारण नसतानाही तुम्ही तुमचा फोन तपासत असता का? तर मग या सवयीवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. मोबाईलच्या अॅडिक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी ही काही अॅप्स तुमची मदत करू शकतात. 
१. फॉरेस्ट 
या अॅपमुळे तुम्ही तुमच्या फोनला विनाकारण हात लावणार नाही. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही एका झाडाचे ऑनलाईन वृक्षारोपण करता. तुम्ही तुमच्या फोनला अर्धा तास हात लावला नाही तर हे झाड वाढू लागते. जितका वेळ तुम्ही तुमचा फोन वापरत नाहीत तितक्या पटापट तुमचे झाड वाढू लागते. 
२. चेकी 
तुम्ही दिवसभरात किती वेळा तुमचा मोबाईल वापरता याची तुम्हाला कल्पनाही नसते. चेकी हे अॅप तुम्हाला ती माहिती अचूकपणे मिळवून देण्यास मदत करते. यामुळे आपण एका दिवसात किती वेळा आपला मोबाईल वापरला हे समजल्यास आपण तो कमी वापरण्याचा प्रयत्न करू शकतो. 
३. प्रोडक्टिव्हिटी चॅलेंज टायमर
हे अॅप फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. हे अॅप तुम्ही मोबाईलवर किती वेळ वाया घालवला याचे मूल्यमापन करते आणि त्या वेळात तुम्ही काय करू शकला असतात याची माहिती देते. त्यानंतर तुम्ही मोबाईल योग्य तऱ्हेने वापरण्याच्या बाबतीत पहिल्यापेक्षा चांगली प्रगती केली की नाही, याची माहिती सुद्धा हे अॅप देते. 
४. फ्रीडम
मोबाईलच्या अतिवापरापासून हे अॅप तुम्हाला मुक्ती देऊ शकते. तुमच्या मोबाईलवर कोणते अॅप्स तुम्ही सर्वात जास्त वापरता याची एक यादी तुम्ही करू शकता. कोणत्या अॅप्समुळे तुमच्या कामावर जास्त परिणाम होतो त्या अॅप्सचा या यादीत समावेश करा. 
५. अनप्लग
तुम्ही आयफोन वापरत असाल तर हे अॅप केवळ १२५ रुपयांत डाऊनलोड करू शकता. यामुळे तुमच्या फोनच्या वापरावर दररोज नजर ठेवता येते. यात तुम्ही रोजच्या वापराची मर्यादा ठरवू शकता. त्यापेक्षा कमी वापर केल्यास तुम्हाला काही पॉईंट्स बक्षीस म्हणून मिळतात. 

Saturday, September 12, 2015

विश्वास बसणार नाही इतके उपयुक्त आणि मोफत अँड्राइड अॅप्स जे जीवन अधिक चांगले करतील :

विविध स्टोअर्स वर विविध कॅटॅगिरीजमधील विनामूल्य खुप अँड्राइड अॅप्स उपलब्ध आहेत. या पोस्ट मध्ये विविध कॅटॅगिरीधील सर्वात जास्त उपयोगी अॅप्स आहेत जे गूगल प्ले स्टोअरवर फ्री मध्ये उपलब्ध आहेत आणि जे खात्रीने तुमचे जीवन अजून चांगल्या पध्दतीने जगण्यास मदत करतील.
1) Best Sporttracking Apps:
i) SmartRunner:
SmartRSmartRunnerunner हे तुमच्या अँड्राइड डिव्हाइस वरील एक sportstracking आणि geotracking अॅप आहे. हे अंतर मोजते, करंट-एव्हरेज आणि सर्वोत्त्म स्पीड मोजते तसेच यासाठी तुम्ही किती कॅलरीज जाळल्या याचा हिशोब सुध्दा ठेवते. यात तुम्ही करीत असलेली रनींग, बाइकिंग, हाइक, वॉक किंवा इतर अॅक्टीव्हिटींचा रेकॉर्ड ठेवते आणि हि सर्व माहिती SmartRunner, फेसबूक किंवा टवीटरवर पब्लीश करते.
डाउनलोड: SmartRunner

ii) Endomondo - Running & Walking:
EndomoEndomondo - Running & Walkingndo हे तुमच्या स्मार्टफोनला पॉकेट पर्सनल ट्रेनर मध्ये बदलवतात. हे अॅप रनिंग, सायकलींग, वॉकिंग आणि इतर स्पोर्टसाठी आइडीयल आहे. Endomondo सोबत तुम्ही या सर्व अॅक्टीव्हिटी जीपीएस दवारे ट्रॅक करू शकता, याच्या स्टॅटीस्टीक्स तपासू शकतात आणि तुमचा फिटनेस गोल पर्यंत पोहचू शकता.
डाउनलोड: Endomondo - Running & Walking

iii) Google Fit:
गूगल फGoogle Fitिट हे तुमची फिटनेस इन्फॉर्मेशन मोजण्यासाठी, ट्रॅक आणि स्टोअर करण्यासाठी वापरू शकता. यात तुम्ही वॉक, रन, बाइक राइड आणि बरेच काही ट्रॅक करू शकता. उदा. तुम्ही किती चाललात, किती बाइक राइडींग केले किंवा किती इतर गेम्स खेळले. ही सर्व माहिती तुम्ही पीसी, मोबाइल डिव्हाइसवर अॅक्सेस करू शकता.
डाउनलोड: Google Fit

iv) RunKeeper - GPS Track Run Walk:
RunKeRunKeeper - GPS Track Run Walk.eper हे अॅप युजरला त्यांच्या फिटनेस अॅक्टीव्हिटी (उदा. चालणे, रनिंग किंवा सायकलिंग) जीपीएस वापरून ट्रॅक करण्यासाठी मदत करते. यात या सर्व अॅक्टीव्हिटींचे ट्रॅक ठेवता येतात आणि सायासाठी किती कॅलरीज जाळल्या हे सुध्दा समजते.
डाउनलोड: RunKeeper - GPS Track Run Walk

2) Best Yoga Apps:
21 जून 2015 रोजी प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेला. योग आपल्या निरोगी जीवनशैली साठी आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवून दीर्घकालीन निरोगी मन आणि शरीर तयार करण्यासाठी योगाचा खुप उपयोग होतो. पण जर तुम्हाला योग क्लास मध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर अॅड्राइड मोबालवर तुम्ही कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी शिकू शकता.
i) Daily Yoga - Fitness On-the-Go:
Daily Yoga - Fitness On-the-Goदैनिक योग प्रत्येकासाठी विकसीत व व्यापक योग प्रशिक्षण सॉफ्टवेअर पुरविण्यावर जास्त लक्ष केंद्रित करीत आहे. हे अॅप हे सुरवाती, मध्यम आणि प्रगत लेव्हलसाठी उपयोगी आहे. यात 50 पेक्षा जास्त एचडी योगा व्हिडीओ आणि 400 पेक्षा जास्त योगा पोज आहेत. तसेच यात योगा करतांना मधूर संगित, सोशल कम्यूनिटी आणि खुप काही आहे.
डाउनलोड: Daily Yoga - Fitness On-the-Go

ii) Yogasana In Hindi:
Yogasana In HindiYogasanas हा योगीक क्रियांचा एक अत्यावश्यक भाग आहे. आणि शरीर रिलॅक्स आणि स्थिर ठेवण्यासाठी याचा खुप उपयोग होतो. हे अॅप हिंदी मध्ये उपलब्ध आहे आणि यात 50 पेक्षा जास्त योगा पोज असून नेव्हिगेशन सोपे आहे.
डाउनलोड: Yogasana In Hindi

4) Best Health App:
i) iTriage Health:
iTriage HealthITriage मध्ये तुम्ही कोणत्याही रोगाची लक्षणे, त्यांची संभावीत कारणे, त्यासाठी योग्य वैद्यकीय सुविधांचा शोध आणि क्वालिटी रिपोर्ट यांचा वापरून तुमचे मेडिकल बिल कमी करू शकता.
डाउनलोड: iTriage Health

ii) Calorie Counter – MyFitnessPal:
Calorie Counterतुम्ही MyFitnessPal चा वापर करून वजन कमी करू शकता. या अॅप मध्ये 5,000,000 अन्नांतील समाविष्ट कॅलरीजचा डाटाबेस आहे जो सतत अपडेट होतो. यात बारकोड स्कॅनर देखील आहे जे अन्नपदार्थांवरील बारकोड स्कॅन करून त्यातील रिसीपी कॅल्क्युलेट करते आणि यात एकाच वेळी अनेक आयटम अॅड करू शकता.
डाउनलोड: Calorie Counter – MyFitnessPal



iii) Instant Heart Rate:
Instant Heart Rateतुमच्या स्मार्टफोनमधील कॅमेरा फ्लॅश वापरून तुमच्या हृदयाचा दर मोजू शकता. आरोग्य सुधारण्यासाठी तुमच्या हृदयाचा दर ट्रॅक करू शकता. यासाठी फक्त तुमच्या बोटाचे टोक कॅमेरा लेन्सवर ठेवा आणि बोटाचा बदलणारा रंगाचे विश्लेषण करून हृदयाचा दर मोजला जाईल.
डाउनलोड: Instant Heart Rate

iv) Lose Weight with Fooducate:
Lose Weight with FooducateFooducate हे तुमच्या आरोग्याचा डायड बॉक्स आहे. हे अॅप तुम्हाला चांगले अन्न खाण्यास मदत करते, वजन कमी करण्यास आणि निरोगी राहण्यास मदत करते. Fooducate चा उपयोग तुमचा डायट, निरोगी आणि फिटनेसचे ध्येय साध्य करण्यासाठी करा.
डाउनलोड: Lose Weight with Fooducate

vi) SleepBot - Sleep Cycle Alarm:
SleepBot - Sleep Cycle AlarmSleepBot मध्ये रात्रीच्या झोपेसाठी आवश्यक सर्व काही सापडेल. SleepBot तुमच्या झोपेचा लॉग ठेवेल, हालचालींचा ट्रॅक ठेवेल आणि प्रत्येक दिवशी सर्वोत्तम वेळी तुम्हाला जागे करेल. हे एक अतिशय सोपे अॅप तुमच्या चांगल्या सकाळ साठी आहे.
डाउनलोड: SleepBot - Sleep Cycle Alarm


5) Best News Apps:
i) NewsHunt : India News | eBooks:
NewsHunt - India News  eBooksNewsHunt हे जगातील सर्वात मोठे बातम्या संकलन आणि ईपुस्तकांना प्रादेशिक भाषेत एकत्र आणते.
डाउनलोड: NewsHunt : India News | eBooks

ii) BBC Hindi:
BBC HindiAndroid साठी बीबीसी हिंदी अॅपद्वारे हिंदी ताज्या बातम्यांसह कनेक्टेट रहा. हे अॅप वापरण्यास अतिशय सोपे आहे आणि यातील न्यूज लेटेस्ट न्यूज, इंडिया, इंटरनॅशनल, इंटरटेनमेंट, स्पोर्ट, सायन्स आणि मल्टीमिडीया यासारख्या अनेक कॅटॅकिगीमध्ये विभागलेल्या आहे.
डाउनलोड: BBC Hindi

iii) News in Shorts- India News App:
News in Shorts- India News Appजर तुम्हाला खूप वेळ खर्च न करता काही मिनिटात सभोवतालच्या जगाविषयी जाणून घ्यायचे असेल तर News in Shorts हे अॅप खुप उपयोगी आहे. News in Shorts दुस-या न्यूज अॅपपेक्षा अजून जास्त आहे यात प्रत्येक बातमी ही 60 किंवा त्यापेक्षा कमी शब्दात लिहिली जाते आणि स्क्रोल न करता तुम्ही यात बातम्या वाचू शकतात आणि तुमचा मौल्यवान वेळ वाचवू शकता.
डाउनलोड: News in Shorts- India News App

Thursday, July 23, 2015

कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर न करता फोल्डर पासवर्ड ने सुरक्षीत करा



आपलयामधील ब-याच जणांकडे काही खाजगी डेटा असतो, जो आपण इतरांपासुन सुरक्षीत ठेऊ इच्छीतो. या ट्रिक चा वापर करुन आपण विंडोज मध्ये कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर न करता फोल्डर पासवर्ड ने सुरक्षीत ठेऊ शकतो.
पुढील कृतीचा अवलंब करा –
  • एक नवी नोटपॅड फाईल ओपन करा व यात खाली दिलेला कोड कॉपी करुन पेस्ट करा.
  • हि नोटपॅड फाईल lock.bat या नावाने सेव्ह करा.
  • आता या lock.bat या फाईलवर डबल क्लिक करा. तुम्हाला येथे MyFolder नावाचे एक फोल्डर तयार झालेले दिसेल.
  • तुम्हाला जो डाटा सुरक्षीत ठेवायचा आहे तो New folder मध्ये कॉपी करा.
  • नंतर lock.bat या फाईलवर डबल क्लिक करा आणि येथे आलेल्या command prompt च्या मॅसेज मध्ये Y टाईप करुन Enter कि प्रेस करावी.
  • आता MyFolder नावाचे हे फोल्डर हाईड झालेले दिसेल.
  • हे फोल्डर पुन्हा बघण्यासाठी lock.bat या फाईलवर डबल क्लिक करावे. येथे तो तुम्हाला पासवर्ड मागेल, हा पासवर्ड टाकून Enter कि प्रेस करावी. (Default पासवर्ड हा abcd आहे.)
  • तुम्ही हा पासवर्ड बदलवू शकता. यासाठी lock.bat या फाईलवर राईट क्लिक करुन Edit हा पर्याय निवडावा. नंतर तुम्हाला हवा असलेला पासवर्ड abcd च्या जागेवर टाईप करावा.
सुचना –
हि ट्रिक सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी आहे. कॉम्प्युटर मध्ये तज्ञ असलेल्या व्यक्ती फोल्डर ऑप्शन मधील unhidden या पर्यायांचा वापर करुन यातील डाटा बघू शकतात. जास्त सुरक्षीततेसाठी तुम्ही lock.bat हि फाईल दुस-या ठिकाणी कॉपी करुन ठेऊ शकता.
Code:

cls

@ECHO OFF

title www.iteguru.com.com

if EXIST "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" goto UNLOCK

if NOT EXIST MyFolder goto MDMyFolder

:CONFIRM

echo Are you sure to lock this folder? (Y/N)

set/p "cho=>"

if %cho%==Y goto LOCK

if %cho%==y goto LOCK

if %cho%==n goto END

if %cho%==N goto END

echo Invalid choice.

goto CONFIRM

:LOCK

ren MyFolder "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"

attrib +h +s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"

echo Folder locked

goto End

:UNLOCK

echo Enter password to Unlock Your Secure Folder

set/p "pass=>"

if NOT %pass%== abcd goto FAIL

attrib -h -s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"

ren "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" MyFolder

echo Folder Unlocked successfully

goto End

:FAIL

echo Invalid password

goto end

:MDMyFolder

md MyFolder

echo MyFolder created successfully

goto End

:End