जुना गॅजेट कसा विक्री करावा? सुरक्षेसाठी प्रथम हे गाइड वाचा
आणि मग विक्री करा.
तुम्ही नविन गॅजेट विकत घेतला आहे का? मग आता तुमच्या जुन्या गॅजेटला निरोप देण्याची वेळ आली आहे आणि लवकरच तो विक्री साठी उपलब्ध असेल. आता वापरंवार आपले गॅजेट बदलण्याची फॅशनच झाली आहे आणि कारणिभूत आहेत ऑनलाइन विक्री करणा-या वेबसाइटसच्या जाहिरातींचा जोरदार प्रचार. तुम्ही कोणतेही गॅजेट आता ऑनलाइन सहजपणे विकू शकतात आणि यात मोबाइल सर्वात आघाडीवर आहे.
पण या गॅजेट मध्ये तुमच्या अॅड्रेस बूक पासून फोटो, व्हिडिओ आणि डॉक्यूमेंटच्या स्वरूपात महत्वपूर्ण माहिती असू शकते. कोणतेही गॅजेट विक्री पूर्वी या डाटाचा बॅकअप घेऊन नंतर तो सुरक्षित डिलीट करावा. पण सावधान! ऑनलाइन उपलब्ध असलेल्या अॅप्सच्या मदतीने हा डेटा सहजपणे रिकव्हर करता येतो. कारण जेव्हा तुम्ही एखादा डेटा डिलीट करता तेव्हा तो प्रत्यक्ष डिलीट होत नाही तर त्याला डिलीटेड म्हणून मार्क केले जाते आणि तो तेथेच असतो जोवर दुस-या एखादया डेटाने तो ओव्हरराइट होत नाही.
येथे काही टिप्स आहेत, वेगवेगळया गॅजेटस् चा बॅकअप कसा घ्यावा आणि ते पूर्णपणे वाइप कसे करावे याविषयी –
Smartphone:
जर तुम्ही तुमच्या कडील जूना स्मार्टफोन विक्री करण्याचा विचार करत असाल तर त्यातील सर्व डेटा पूर्णपणे नष्ट केला आहे याची खात्री करा.बॅकअप कसा घ्यावा आणि तो फोन वाइप कसा करावा -
Android:
बॅकअप कसला घ्यावा याची सूची तपासा:
microSD – जर फोन मध्ये मायक्रोएसडी कार्ड असेल तर ते जून्या फोन मधून काढून नविन फोन मध्ये टाका. Address Book – पूढील मार्गाने जा Contact --> Menu --> Import/export option --> Export to Storage. आता मेमरी मध्ये .vcf फाइल तयार झाली असेल. हि फाइल नव्या फोन मध्ये ट्रान्सफर करून Contact मध्ये Import करा.
Photos, videos and other data – तुमचा फोन पीसी ला कनेक्ट करा आणि हा डाटा पीसी मध्ये कॉपी करा आणि नंतर तो नविन फोन मध्ये ट्रान्सफर करा किंवा Software Data Cable चा वापर करून सरळ एका फोन मधून दूस-या फोन मध्ये ट्रान्सफर करा.
WhatsApp – WhatsApp ओपन करा आणि Options --> Settings--> Chat History --> Backup conversations ला टॅप करा. आता हे WhatsApp चे फोल्डर नविन मोबाइल मध्ये ट्रान्सफर करा आणि यात WhatsApp इन्स्टॉल करत असतानां Restore चा पर्याय वापरा.
नोट: वरील सर्व गोष्टींचा सेटिंग्ज सह बॅकअप घेण्यासाठी Mobogenie किंवा MOBILedit पीसी सूटचा वापर करणे सोइस्कर होते.
बॅकअप घेतल्यानंतर जून्या फोनमधील हा डाटा नष्ट करण्यासाठी Android मोबाइल मध्ये Factory Reset ची सुविधा आहे आणि ती प्रत्येक ब्रॅंड साठी वेगवेगळी आहे. पण हे पुरेसे नाही, कारण हा डाटा रिकव्हर करता येऊ शकतो. आणि म्हणूनच फोन फॅक्टरी रिसेट केल्यानंतर त्यात डमी डेटा भरा, तो डिलीट करा आणि पुन्हा डमी डेटा भरून डिलीट करा. या अतिरिक्त कृती मूळे फोन मधील ओरिजन डाटा रिकव्हर होण्याची शक्यताच राहत नाही.
USB Drives, SD Cards and External Hard Drives and other removable media:
यूएसबी ड्राइव्ह, SD कार्ड आणि एक्सटर्नल हार्ड ड्राइव्हस् आणि इतर रिमूव्हेबल ड्राइव्हचा बॅकअप घेणे सोपे आहे. फक्त यातील डाटा कॉपी करून सुरक्षित ठिकाणी पेस्ट करावयाचा आहे. पण यातील डेटा पुर्णपणे डिलीट करण्यासाठी खालील बेसिक स्टेप्स आहेत -
ड्राइव्ह कॉम्प्यूटरला कनेक्ट करा.
- My Computer मध्ये जाऊन या ड्राइव्हवर राइट क्लिक करा आणि Format सिलेक्ट करा.
- File System मध्ये हवी ती फाइल सिस्टिम सिलेक्ट करा.
- Volume Label मध्ये या ड्राइव्ह साठी एक लेबल दया आणि Quick Format हा पर्याय सिलेक्ट करा.
- फॉरमॅटची प्रोसेस सुरू होण्यासाठी Start वर क्लिक करा.
जर हा एक्सटर्नल हार्ड ड्राइव्ह पुर्णपणे वाइप करावयाचा असेल जेणेकरून नंतर त्यातील डेटा रिकव्हर होऊ शकणार नाही तर थर्ड पार्टी टूल CCleaner चा वापर करा. CCleaner हे येथून डाउनलोड करा - http://www.piriform.com/ccleaner/download
- CCleaner ओपन करा.
- Tools>>Drive Wiper मध्ये जा.
- येथे जो एक्सटर्नल ड्राइव्ह वाइप करावयाचा असेल तो सिलेक्ट करा आणि खालील Wipe बटनावर क्लिक करा.
Laptop or Desktop:
जुना लॅपटॉप किंवा डेस्क्टॉपची विक्री करण्यापूर्वी पूढील गाइडचा वापर करा –
लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा बॅकअप घेण्यासाठी बहूतेक युझर्स हे लोकल बॅकअप साठी एक्सटर्नल हार्ड डिस्क चा पर्याय निवडतात. पण जर डेटा खुप जास्त असेल तर थर्ड पार्टी टूल Comodo Backup किंवा Robocopy चा वापर करावा. तसेच मॅक मध्ये System Preferences > Time Machine मध्ये जा आणि Select Backup Disk मधून एक्सटर्नल हार्ड डिस्क निवडा.पण यातील डिलीट केलेला डेटा पुन्हा रिकव्हर होण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून यातील डेटा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी Eraser, CCleaner किंवा Darik's Boot & Nuke यांचा वापर करावा.
बस्स! आता तुमचे गॅजेट बाहेर विक्रीसाठी तयार आहे.