Wednesday, March 16, 2016

लॅपटॉप घेतांना या ८ गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही लॅपटॉप घेण्याच्या विचारात आहात तर ही माहिती तुम्हाला उपयोगात येऊ शकते. लॅपटॉप घेतांना या गोष्टींचा विचार करून लॅपटॉप घ्या. तुम्हाला लॅपटॉप निवडतांना या गोष्टी मदत करतील. 
टच स्क्रीन : जर तुम्हाला टच स्क्रीन गॅजेटची आवड असेल तर तुम्ही टच स्क्रीन लॅपटॉपचा विचार करू शकता. ३०००० पर्यंत टच स्क्रीन लॅपटॉप उपलब्ध आहेत. 
पोर्ट : लॅपटॉप खरेदी करतांना पोर्ट किती आहेत हे तपासून घ्या. एचडीएमआई, यूएसबी, एचडी कार्ड स्‍लॉट हे पोर्ट आहेत का हे नेहमी तपासून घ्या. तुम्ही लॅपटॉप कोणत्या कामासाठी घेणार आहात ही गोष्ट देखील पोर्टसाठी महत्त्वाची ठरते.
वजन आणि डिझाईन : जर तुम्ही प्रवासादरम्यान लॅपटॉप वापरणार असाल तर तुमच्या लॅपटॉपचं वजन महत्त्वाचं ठरतं. अशा वेळेस कमी वजनाचं आणि कमी साईजचा लॅपटॉप तुम्ही घेतला पाहिजे. १२ ते १३ इंचचा लॅपटॉप हा प्रवासादरम्यान वापरतांना उत्तम ठरू शकतो.
ऑपरेटींग सिस्टम : अनेकदा काही लोकं थोडे पैसे वाचवण्यासाठी ओएस नसलेला लॅपटॉप खरेदी करतात. डॉटबेस लॅपटॉप घेतल्यानंतर जर तुम्हाला ओएस इंस्टॉल करता येत नसेल तर ते तुम्हाला महाग पडू शकतं. त्यामुळे ओएस इंस्टॉल असणाराच लॅपटॉप तुम्ही खरेदी करा.
लॅपटॉपचा आकार : जर तुम्ही लॅपटॉप घरी किंवा ऑफिसमध्ये वापरण्यासाठी घेणार असाल तर मोठ्या आकाराचा लॅपटॉप तुम्ही खरेदी करू शकता. पण जर तुम्हाला प्रवासादरम्यान किंवा बाहेर लॅपटॉप वापरायचा असेल तर छोट्या आकाराचा लॅपटॉप खरेदी करा.
फीचर : इंटेल आणि एएमडी मल्टीकोर सीपीयू असलेला लॅपटॉप असणं अधिक चांगलं आहे. यामुळे तुम्हाला चांगली स्पीड मिळेल. त्यासोबतच ३ ते ४ युएसबी स्लॉट असले पाहिजे. 
जुना लॅपटॉप : जुना लॅपटॉप खरेदी करू नका. जुन्या लॅपटॉपचे पार्ट्स जुने झाल्यामुळे कमी स्पीड मिळते. सोबतच तुमचा पर्सनल डेटा हा सुरक्षित राहिलंच याची गँरेटी नाही. 
ऑफर : लॅपटॉप घेतांना ऑफरची वाट पाहु नका. जुने ऑपरेटींग सिस्टीमचे लॅपटॉप विक्री वाढवण्यासाठी दुकानदार अशा ऑफर देतात.  ज्यामध्ये तुमचा काही फायदा असतोच असे नाही. लॅपटॉप घेतांना या ८ गोष्टी लक्षात ठेवा

कीबोर्डवरच्या f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो

दरदिवशी कम्प्युटर तसेच टेक्नॉलॉजीमध्ये काहीनाकाही बदल होत असतात. दरदिवशी आपण दिवसातील सात ते आठ तास कम्प्युटरसमोर बसून काम करत असतो.

मात्र काम करताना तुम्ही हे नोटीस केलंय का की कीबोर्डवर f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो. त्यामागेही कारण आहे. टायपिंगच्या नियमानुसार कीबोर्डवर हा मार्क देण्यात आलाय. 
स्क्रीनवर बघून टाईप करत असताना टाईपिंगच्या नियमानुसार अंगठ्च्या बाजूचे बोट f आणि j या अक्षरावर असणे गरजेचे असते. तसेच इतर बोटे कीबोर्डवरच्या इतर अक्षरांवर असणे गरजेचे असते. त्यामुळेच योग्य प्रकारे टायपिंग करता यावे यासाठी या दोन्ही अक्षरांखाली हा मार्क असतो. 
कीबोर्डवरच्या f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो

मोबाईल अॅडिक्शनपासून दूर ठेवणार हे पाच अॅप

आपल्या मोबाईलवर कायम काही ना काही करण्याची सवय तुम्हाला आहे का? अगदी काही कारण नसतानाही तुम्ही तुमचा फोन तपासत असता का? तर मग या सवयीवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. मोबाईलच्या अॅडिक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी ही काही अॅप्स तुमची मदत करू शकतात. 
१. फॉरेस्ट 
या अॅपमुळे तुम्ही तुमच्या फोनला विनाकारण हात लावणार नाही. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही एका झाडाचे ऑनलाईन वृक्षारोपण करता. तुम्ही तुमच्या फोनला अर्धा तास हात लावला नाही तर हे झाड वाढू लागते. जितका वेळ तुम्ही तुमचा फोन वापरत नाहीत तितक्या पटापट तुमचे झाड वाढू लागते. 
२. चेकी 
तुम्ही दिवसभरात किती वेळा तुमचा मोबाईल वापरता याची तुम्हाला कल्पनाही नसते. चेकी हे अॅप तुम्हाला ती माहिती अचूकपणे मिळवून देण्यास मदत करते. यामुळे आपण एका दिवसात किती वेळा आपला मोबाईल वापरला हे समजल्यास आपण तो कमी वापरण्याचा प्रयत्न करू शकतो. 
३. प्रोडक्टिव्हिटी चॅलेंज टायमर
हे अॅप फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. हे अॅप तुम्ही मोबाईलवर किती वेळ वाया घालवला याचे मूल्यमापन करते आणि त्या वेळात तुम्ही काय करू शकला असतात याची माहिती देते. त्यानंतर तुम्ही मोबाईल योग्य तऱ्हेने वापरण्याच्या बाबतीत पहिल्यापेक्षा चांगली प्रगती केली की नाही, याची माहिती सुद्धा हे अॅप देते. 
४. फ्रीडम
मोबाईलच्या अतिवापरापासून हे अॅप तुम्हाला मुक्ती देऊ शकते. तुमच्या मोबाईलवर कोणते अॅप्स तुम्ही सर्वात जास्त वापरता याची एक यादी तुम्ही करू शकता. कोणत्या अॅप्समुळे तुमच्या कामावर जास्त परिणाम होतो त्या अॅप्सचा या यादीत समावेश करा. 
५. अनप्लग
तुम्ही आयफोन वापरत असाल तर हे अॅप केवळ १२५ रुपयांत डाऊनलोड करू शकता. यामुळे तुमच्या फोनच्या वापरावर दररोज नजर ठेवता येते. यात तुम्ही रोजच्या वापराची मर्यादा ठरवू शकता. त्यापेक्षा कमी वापर केल्यास तुम्हाला काही पॉईंट्स बक्षीस म्हणून मिळतात.